तालुक्यातील ५० टक्के जमीन ओलिताखाली आणणार-आमदार उन्मेश पाटील

0

चाळीसगाव-गेल्या वर्षी मागेल त्याला गोठा अंतर्गत तीन हजार गोठे, एक हजार कांदा चाळी देण्यात आल्या. सद्यस्थितीत तालुक्यातील जमीन २० टक्के ओलिताखाली असून येत्या काळात जमीन ५० टक्के ओलिताखाली यावी याकरिता रखडलेल्या जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जास्तीचा निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे असे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. चाळीसगाव तालुका उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ओलिताखाली जमीन असलेला तालुका ओळखला जाईल असा दावा देखील आमदार उन्मेष पाटील यांनी केला आहे.

आज जागतिक मृदा दिननिमित्त ६८ गावातील ७४१८ माती नमूने आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट भोळे, उपसभापती संजय पाटील, माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, विद्यमान सदस्य भाऊसाहेब पाटील, कै.ची.पाटील, सुभाष पाटील, तालुका कृषि अधिकारी अरविंद देसले, मंडळ कृषि अधिकारी अनिल येवले, शिवदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नरेद्र जैन, चंद्रदित्य बहुउद्देशिय संस्थेचे सचिन वाघ, स्वप्नील ठुबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदारांच्याहस्ते वसंत कुमावत बेलदारवाडी, मुकेश चौधरी कोदगाव, किशोर कुमावत, डिंगबंर कुमावत तांबोळे, अनिल पाटील, बेबाबाई पाटील, संतोष मोरे, ज्ञानेश्र्वर कुमावत आदी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मृदा आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले. यशस्वितेसाठी कृषी सहाय्यक अंविनाश चंदेले, प्रशांत वाघ, अनिल महाजन यांनी परिश्रम घेतले.