तालुक्यात शांतता भंग करणार्‍यांची गय नाही

0

शिरपूर। शिरपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या बदलीनंतर नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी तालुकावासींयाना शांतता राखण्याचे आवाहन केले असुन शांतता भंग केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा शांतता कमिटीच्या बैठकीत दिला.

करवंद प्रकरणामुळे पवार यांची बदली
करवंद येथील प्रकरणामुळे पोलीस अधिक्षक एस चैतन्या यांनी शिरपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सहाय्यक निरीक्षक अकबर पटेल यांची तात्काळ बदली केल्यानंतर याठिकाणी धुळे विशेष शाखेतील अनिल वडनेरे यांना शिरपूर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी वडनेरे यांनी शिरपूर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक म्हणुन जबाबदारी हाती घेतली. त्यांनतर शांतता कमीटीची बैठक कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. मात्र अशा परिस्थितीत शहरात किंवा गावात कोणीही शांतता बिगडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारादेखील त्यांनी दिला.

गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन
शिरपूर शहरात काही महिन्यापासुन बनावट दारू, चोर्‍या,घरफोड्या यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. बनावट दारू प्रकरणी आ.अमरिशभाई पटेल,आ.काशिराम पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी मोर्चा देखील काढला होता. त्याचप्रमाणे शिरपूर शहरात विविध गटामंध्ये दंगलीचे प्रमाणदेखील वाढत होते. नुकतीच करवंद येथे दंगल झाल्यामुळे शहराचे वातावरण तनावपुर्ण झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत वडनेरे यांची कर्तव्याची पार्श्‍वभुमी चांगली बोलली जात असली तरी त्यांना शिरपूर तालुक्यातील अनेक गंभीर समस्यांवर काम करावे लागणार असल्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.