शिंदखेडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील पोलीस पाटील डॉ. महेंद्र पाटील यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनी तावखेडा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वाढदिवस म्हटला की मोठा केक डीजे व जेवणावळीवर मोठा खर्च केला जातो. मात्र या सर्व गोष्टी बाजूला ठेवून चिरंजीव निरंजन यांच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.पाटील यांनी तावखेडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील होते.या कार्यक्रमास उपसरपंच प्रदीप रोकडे, हिंमत गिरासे, नरेंद्र जाधव, तूषार पाटील, मुख्याध्यापक मगांसे, विशाल माध्यमिक शाळेच्या चेअरमन सौ कोकिळा पाटील, विजूबाई जाधव, रेखाबाई पाटील उपस्थित होते.