सोलापूर । सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळला आणि नामांतराचे निवेदन पत्रकंही भिरकावली. शिवाय, ’येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणाबाजीही केली. चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे, लिंगायत समाजाच्या वतीनेही महात्मा बसवेश्वरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न चिघळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.