तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला जामीन

0

जळगाव। रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍या एकाला बालाजीपेठेतून मुंबई, जळगाव, भुसावळ पोलीसांनी संयुक्तीक कारवाई करीत पकडल होते. त्या संशयिताला आज भुसावळ न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयीन कोेठडी सुनावली. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमुुळे काळाबाजार करणार्‍याचे धाबे दणाणले आहे.

पथकाने बालाजीपेठेत मारला छापा
जळगाव शहरामध्ये बनावट आयडी तयार करुन प्रवाश्यांना वाढीव दराने आरक्षीत तिकीट उपलब्ध करुन देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथील मुख्य सतर्कता विभाग, वाणिज्य विभाग तसेच जळगाव आरपीएफ, भुसावाळ क्राईम ब्रान्च विभगाच्या पथकाने जळगावातील बालाजी पेठमधील रथचौकातील मयुर बालुलाला सोनी (वय 25) यांच्या तिरपुती टुर्स ट्रॅव्हस् आणि रेल्वे ई- टिकट या दुकानावर अचानक छापा मारत अटक केली होती. त्यानंतर मयुर सोनी यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर हस्तगत करण्यात आले होते. तसेच 20 हजार 70 रुपयांची सात ई- तिकटे असे एकुण 23 हजार 65 रुपयांची तिकटे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी टिकाटांचा काळाबाजार करणार्‍या मयुर सोनी याला आरपीएफ पोलिसांनी भुसावळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सोनी याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संशयित सोनी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने मंजूर केला आहे.