तिकीटासह एक कोटी घ्या अशी भाजपाची निती – खा.संजय राऊत

0

धुळे- महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपा सरकार मधील मंत्री आकड्याचे खेळ खेळत आहेत. रोज नवीन योजना आणि निधींची घोषणा करीत आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारांना तिकीटासह एका कोटी रुपये घ्या असे भाजपा पदाधिकारी सांगत आहेत अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. धुळ्यात ते बोलत होते.

राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी शिवसेनेने दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यांवर आहेत. शुक्रवारी धुळ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

धुळे शिवसेनेत कोणताही गट-तट नाही. धुळे महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. लोकसभा निवडणूकीत नंदुरबार व धुळे जिल्ह्यात शिवसेना स्वतंत्र्य उमेदवार देणार आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात कोट्यावधीचे निधी देण्याची घोषणा करीत आहेत. नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. मात्र वास्तव काहीच नाही. मोठ-मोठी आकडेवारी जाहीर करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. असे ही ते म्हणाले.

केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. धुळ्यातून पाकीस्तानचा बंदोबस्त करण्याची भाषा होवू शकते. शिवसेना जनतेची दिशाभूल करीत नाहीत. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भूसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.