जळगाव। जिल्हा कोर्टासमोरील मोबाइलच्या दुकानात 6 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल लंपास केले होते. अशाच प्रकारच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिस पोलिसांनी तीन संशयीताना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक करून न्यायालयात हजर केले असता 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपली असता तिघांना न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयनी कोठडी सुनावली आहे.
जे. टी. चेंबरमधील जी-1 या राजेंद्र अरूण बारी आणि पुरूषोत्तम अरूण बारी या दोन्ही भावांच्या वायरलेस वर्ल्ड नावाच्या मोबाइल दुकानातून चोरट्यांनी 6 एप्रिल रोजी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल लंपास केले होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मिन्टूकुमार देविकांत ठाकूर, समीर शहा मुस्तफा देवान, अब्दुल कादीर अस्लम देवान या तिघा संशयितांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 16 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता तिघा संशयितांना न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्या. कुलकर्णी यांच्या न्यायालयात कामकाज होवून त्यांनी तिघांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.