जळगाव। कचरा टाकल्याच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मारहाण करणार्या तिघांविरूध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या संशयित तिघांनी जामिन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज कामकाज होवून तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावल आहे.
कचरा टाकल्याच्या कारणावरून भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी मुबिन अली हा तरूण त्या ठिकाणी गेला. मात्र, शेख युनुस शेख गुलाम रसुल, शबाना शेख युनुस, शेख अरशद शेख युनस या तिघांनी त्यास बेदम मारहाण केली. त्यात तो जखमी झाला आणि उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला. यानंतर नसिमबानो आबीद अली कादरी यांच्या फिर्यादीवरून धरगणाव पोलिसात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तिघे सध्या कारागृहात असून त्यांनी जामीना मिळण्यासाठी न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर आज कामकाज होवून ते अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.