जळगाव । कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून शहरातील तीन वाळू ठेकेदारांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. जिल्ह्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात जिल्हा पोलीस दलाची बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी शस्त्र परवाने असलेल्याची माहीती घेतली होती. वाळू ठेकेदारांसह ज्यांना गरज नाही अशांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार सार्वजनिक शांतता अबाधित रहावी याकरीता परेश दिलीपराव कोल्हे, सागर मोतीलाल चौधरी, सुनिल रामनारायण मंत्री या तीन जणांचे शस्त्र परवाने रद्दची कारवाई आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली.