जळगाव – जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना सर्पदंश तर दोघांना विषबाधा झाला. कुटुंबियांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. विक्की उत्तम पाटील (वय २४, रा.वलवाडी, ता.भडगाव), सुनील विठ्ठल चौधरी (वय ६०, रा.थोरगव्हाण, ता.रावेर) व हुसेनबी सय्यद अली (वय ६६, रा.कासोदा, ता.एरंडोल) यांना सर्पदंश झाली आहे. तर ज्ञानेश्वर जनार्दन धनगर (वय ३३, रा.नेरी, ता.जामनेर) व आयेशाबी रईसखान पठाण (वय २०, रा.गोंदेगाव, ता.सोयगाव) यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.