तिघांना सर्पदंश तर दोघांना विषबाधा

0

जळगाव – जिल्ह्यातील तरसोद, गिरड आणि कोळवडा येथील तिघांना वेगवेगळ्या घटनेत संर्पदंश झाल्याने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, माधुरी राजेंद्र पाटील (वय-24) रा.तरसोद ता.जि.जळगाव, वाल्मिक सोहबराव पाटील (वय-28) गिरड ता.भडगाव आणि संजय रामदास पाटील (वय-48) कोळवाडा ता. यावल यांना वेगवेगळ्या घटने वेगवेगळ्या ठिकाणी सपाने चावा घेतला. तिघांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून आता प्रकृती स्थिर आहे. तर दुसऱ्या दोन घटनेत मिताली शांन्ताराम पाटील (वय-18) दोनगाव ता. धरणगाव आणि प्रकाश शिवराम चौधरी (वय-28) कळमसरा ता. पाचोरा यांनी किरकोळ कारणावरून कोणतेतरी विषारी औषध घेल्याने नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.