तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान

0

एक नागरिकही ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी रात्री उशिरा सुरू झालेली चकमक सोमवारी थांबली. या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला. मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. 5 डिसेंबरला दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यात दोन पाकिस्तानचे नागरिक होते. तिन्ही दहशतवाद्यांचा जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता.

वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान
दहशतवाद्यांना सुरक्षित वातावरण मिळण्याआधीच त्यांना ठार मारण्यासाठी यावर्षी हिवाळ्यातही भारतीय सैन्याने ऑपरेशन ऑल आऊट राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी हिवाळ्यात ऑपरेशनचा वेग कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. गुजरात निवजडणूक संपल्यानंतर सीआरपीएफतडे काश्मीरमधील कारवाईसाठी आणखी जवान असतील. सीआरपीएफचे सुमारे पाच हजार जवान डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात काश्मीरला पोहोचतील. यावर्षी सुरक्षा दलांच्या कारवाईत जे 200 दहशतवादी मारले गेले त्यापैकी 40 दहशतवादी जिल्हा कमांडर किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचे होते. यापैकी अनेक दहशतवादी चार-पाच वर्षांपासून सक्रीय होते.