तिचे खोटे तुम्ही पकडूचं शकत नाही – रणवीर सिंग

0

मुंबई : ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. दोघांचेही सेटवरचे फोटो, व्हिडिओ बघता लोकांना ही जोडी पसंत पडत आहे. ‘सिम्बा’च्या सेटवर सारा आणि रणवीरची मैत्री चांगलीच बहरली आहे. दोघेही एकमेकांचे ब्रेस्ट फ्रेन्ड झाले आहेत.

रणवीर सिंग अलीकडे अक्षय कुमारसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आला होता. या शोमध्ये रणवीरने अनेक खुलासे केलेत. यापैकीचं एक खुलासा सारा अली खानबद्दल होता. ‘तुझ्यानुसार, इंडस्ट्रीत असा कुठला कलाकार आहे, ज्याचे खोटे पकडणे कठीण आहे?’, असा सवाल करणने रणवीरला केला होता. यावर, रणवीरने सारा अली खानचे नाव घेतले. तिचे खोटे तुम्ही पकडूचं शकत नाही. ज्या आत्मविश्वासाने ती तुमच्यासोबत बोलते की, तुमच्यासोबत काही चुकीचे होतेय, याचा अंदाजही तुम्ही बांधू शकत नाही, असे रणवीर म्हणाला. साहजिकचं रणवीरचे हे उत्तर ऐकून करण जोहर अवाक झाला. करण जोहरला साराचा बॉलिवूडमधील मेंटॉर म्हणून ओळखले जाते.