तिड्या येथून 75 हजारांचा धावडा डिंक जप्त

0

यावल : रावेर तालुक्यातील तिड्या येथील एका पडीत गोठ्यात डिंक असल्याची गोपनीय माहिती यावल विभागाच्या फिरत्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करत 75 हजार रुपये किंमतीचा पाच गोणी भरलेला धावडा डिंक जप्त केला. मालमत्ताधारक मात्र मिळून आला नाही. ही कारवाई गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, शिवाजी माळी, जगदीश ठाकरे, संदीप पंडीत, वाहनचालक योगीराज तेली आदींच्या पथकाने केली.