तिने लग्न मंडपातूनच केले प्रियकराचे अपहरण

0

लखनऊ। बंदुकीचा धाक दाखवत लग्नाच्या मंडपातून आपल्या माजी प्रियकराचं अपहरण करणार्‍या ‘रिव्हॉल्वर राणी’ला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करीत असून अद्याप नवरदेवाचा पत्ता लागलेला नाही. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा गावातील ही घटना आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील सीन शोभावा त्याप्रमाणे तरुणीने लग्नमंडपात सर्वांच्या डोळ्यादेखत आपल्या माजी प्रियकराचं अपहरण केलं होतं. यानंतर शहरभर या घटनेची चर्चा सुरू झाली होती.

लग्नाच्या मंडपातून तरुणाने आपल्या प्रेयसीचं अपहरण केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या प्रियकराचे लग्नाच्या मंडपातून अपहरण केल्याची घटना समोर आली होती. लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर आला असताना तरुणीने लग्नमंडपात प्रवेश करत बंदूक बाहेर काढली आणि आपल्या माजी प्रियकराचं अपहरण केलं. मंगळवारी ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी तरुणीला अटक करण्यात आले असले तरी नवरदेवाचा शोध अद्याप सुरू आहे.