जळगाव । नशेचे पान खाऊ घालून पोलिस उपनिरीक्षकाच्या पोलिस मुलाने चोवीस वर्षीय तरुणीवर पोलिस मुख्यालयाच्या गेम्स रुमसह कॅन्टीनमध्ये बलात्कार-अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयीत पितापुत्रास अंतरिम जामीन मिळाला होता. आज गुरूवारी अखेर अंतरीम जामीनाची मुदत संपल्याने जिल्हा न्यायालयात या प्रकरणी कामकाज होवुन फिर्यादी, बचावपक्ष आणि सरकारी वकीलांनी आपआपली बाजु मांडली. तिन्हीपक्षाचे कामकाज होवुन जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिसदलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत अधिकार्याचा मुलगा परवेज शेख याने लग्नाचे आमीषदाखवुन तरुणीवर सलग 2012 पासून बलात्कार केल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पिता-पुत्रा विरुद्ध 21 जुन रोजी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील संशयीत परवेज व त्याचे वडील रईस शेख दोघेही 29 जुन पर्यंत अंतरीम जामीनावर होते.
आत्मदहनाच्या इशार्यानंतरच गुन्हा दाखल…
आज जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज झाले. चोविस वर्षीय पिडीता, संशयीत पिता-पूत्र न्यायालयात हजर होते. सुरवातीलाच पिडीतेतर्फे फिर्यादी पक्षाने बाजु मांडली. अॅड. निरंजन चौधरी यांनी न्यायायालयात सांगीतले की, पिडीतेने 8 जुन रोजी वरीष्ठ अधिकार्यांकडे तक्रार दिली असतांना चौदा दिवसानंतर पिडीतेने अत्मदहनाचा ईशारा दिल्यावर 21 जुन रोजी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पिडीतेने दिलेल्या मुळ पाच पानी तक्रारीची तोड-मोड करुन पोलिसांनी त्यांच्या मर्जीने तक्रारीत मुद्दे घातले. नशेचे पान खाऊ खालून बलात्कार केल्याचे आमच्या तक्रारीत कुठेही उल्लेख नसतांना हा मुद्दा घुसळण्यात आला. संशयीत व पिडीतेच्या संभाषणाचे तब्बल 265 रेकॉर्डींग पोलिसात दिले आहेत. संशयीत परवेज याने लग्नाचे आमीष दाखवत औरंगाबाद तालूक्यातील फर्दापूर येथे हॉटेल सहारा, हॉटेल सपना आणि हॉटेल पद्मपाणी येथे वेळोवेळी अत्त्याचार केलेत. तेथे रुम उपलब्ध करुन देणारा त्याचा मित्र समीर सुलेमान तडवी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेणे बाकी आहे. संशयीतांच्या आवाजाचे नमुने घेतले गेलेले नाही, अटकपुर्व जामीन दिल्यास त्याचा साक्षीरांवर पोलीस अधिकारी असल्याने प्रभाव पडण्याची शक्यता असुन जामिन देण्यात येवूनये असेही अॅड. चौधरी म्हणाले.
दोघेही लिव्ह ईन रिलेशन मध्ये
संशयीतातर्फे अॅड.सागर चित्रे यांनी बाजु मांडतांना न्यायालयाच्या निदर्षनास आणुन दिले की, तक्रारदार म्हणत असल्या प्रमाणे पाच पानांच्या तक्रारीत, (पॅरेग्राफ नंबर 6 पान नंबर 2 वर) आम्ही दोघे पती-पत्नी प्रमाणेच राहत होतो. पहिल्यांदा जेव्हा अत्त्याचार केला, तेव्हा परवेजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही 10 ऑक्टोबर 2012 रोजी अजिंठा येथे गेलो होते असे म्हटले आहे. सोबत अमीत तडवी, अमोल मोरे आणि त्या दोघांसोबत दोन वेगळ्या तरुणी (त्यांच्या प्रेयसी) होत्या. अर्थातच अजिंठा हे पर्यटनस्थळ आहे, सगळेच कुटूंबीय तेथे सुटीचा आनंद घेण्यासाठी जातात. मग फिर्यादी पक्षाने त्या तीन मित्रांनाही आरोपी करण्याची मागणी करायला हवी होती तसे झालेले नाही. तक्रारदार तरुणी अल्पवयीन नसुन ती ग्रॅज्युएट गर्ल’ आहे, लव्हबर्ड’ च्या तीन जोड्या होत्या अर्थात सर्व कन्सर्न थेअरी प्रमाणे प्रकरण असुन बलात्काराचा प्रश्नच उदभवत नाही. राहिला प्रश्न कारवाईचा तर पोलिस खात्याने अगोदरच आम्हाला निलंबीत केले आहे. खातेअंतर्गत चौकशीही सुरु आहे. या प्रकरणात मुलीच्या पालका व्यतिरीक्त वेगळ्याच लोकांना अधिक रस असल्याचे सांगत अॅड. चित्रे यांनी 28 जुनचे दैनिक न्यायालयात सादर केले. फिर्यादीने प्रेस कॉन्फरन्स घेवून प्रेस समक्ष आरोप केले, कृपया या प्रकरणात जातीयतेचा प्रश्नच नसुन दोघांच्या संमतीनेच संबध राहिलेल्याचे पिडीतेची तक्रार, तपासाधिकार्याचा से’ आदींमधुन समोर येत असल्याचे ऍड. चित्रे यांनी न्यायालयाच्या निदर्षनास आणुन दिले. सरकारपक्षाची बाजु मांडतांना सरकारी अभियोक्ता अॅड. प्रवीण भोंबे यांनी सांगीतले की, दाखल गुन्ह्यात मुळातच तक्रारदार तरुणीच्या मुळ तक्रारीतील मुद्दे वगळण्यात आले आहे. पोलिसांनी स्वत:च्या मनाने तक्रारीत नसलेले मुद्दे टाकले, हे सर्व संशयीताचा पिता उपनिरीक्षक असल्या मुळे घडले आहे. परवेज ने पिडीतेचे निसर्गचक्र थांबल्याने गोळी आणून दिली होती, संशयीताला हॉटेलमध्ये रुम मिळवून देणारा समीर सुभान तडवी हा अद्याप फरार असून तो संशयीतांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. संशयीतांच्या आवाजाचे नमुने संकलीत करायचे आहे, दोघांच्या अटके शिवाय प्रॉपर इन्व्हेस्टींगेशन होणे शक्य नाही. तसेच पोलिस असल्याने साक्षीदारांवर दबाव येईल असेही अॅड. भोंबे म्हणाले.