तिन म्हशी चोरणारा पोलीसांच्या जाळ्यात

0

पिकअप व्हॅन जप्त; पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा

वरखेडी – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस हद्दीतून 17 व 18 सप्टेंबर रोजी दरम्यान राजूरी शिवारातील शेतातील पत्री शेडमधून 2 म्हैस आणि एक वगार अशी तिन जनावरे 95 हजार रूपये किंमतीची अज्ञान चोरट्याने चोरून नेली होती याबाबत 18 सप्टेंबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील संशयीत आरोपी नाना जगन्नाथ पाटील रा. वरखेडी ता.पाचोरा याला ताब्यात घेतले असून सदरील गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभाष महादु कोठावदे यांचे राजूरी शिवारातील शिंदाड-वरखेडी रोडलगतच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमधू बांधलेली एक म्हैस आणि एक वगार आणि रसवर अन्वर तडीव यांची एक म्हैस असे 95 हजार रूपये किंमतीच्या तीन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. सुभाष कोठावदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीनुसार पोलीसांना संशयित आरोपी नाना जगन्नाथ पाटील उर्फ नाना फिटर रा. वरखेडी ता.पाचारेा यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देत असतांना खाक्या दाखवताच केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या ताब्यातील एम04 सीयू 6907 ही पिकअप गाडीही जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
सपोनि संदीप पाटील, पोउनि दिलीप पाटील, सहा.फौजदार दिली पाटील, पोना प्रल्हाद शिंदे, शिवनारायण देशमुख, पोकॉ सचिन पवार, ज्ञानेश्वर बोडखे, संदीप राजपुत, प्रमोद पाटील, संभाजी सरोदे यांनी कारवाई केली. पुढील तपास पोउनि दिलीप पाटील हे करीत आहे.