तिरंगा एकता संमेलनाचे आयोजन

0

चिंचवड (प्रतिनिधी) – 69 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘तिरंगा एकता संमेलन’ या उपक्रमाचे काकडे पार्क मित्र मंडळ व आम्ही चिंचवडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने काकडे पार्क चौकात आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मधू जोशी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मधू जोशी, रा.स्व.संघ सामाजिक समरसता मंचाचे प्रांत कार्यवाह पंजाबराव मोंढे, नगरसेवक शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, महाराष्ट्र वीज महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, काकडे पार्क मित्र मंडळाचे नयन पालांडे आदी उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे वाचन!
यावेळी मधुकर बच्चे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. नगरसेवक शेडगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंदेश वाचून दाखविला. शेवटी ज्येष्ठ नेते मधू जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, कलावंत व साहित्यिक आदींचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक शेडगे यांनी ‘तिरंगा एकता संमेलन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले तर नयन पालांडे यांनी आभार मानले.