जकार्ता- भारतीय महिला तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या सांघिक गटात रौप्यपदकाची कमाई केली. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला अंतिम लढतीत दक्षिण कोरियाकडून हार पत्करावी लागली. कोरियाने 231-218 अशा फरकाने विजय मिळवला.
चुरशीच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सेटमध्ये 59-57 अशी आघाडी घेत दणक्यात सुरूवात केली, परंतु कोरियन खेळाडूंनी दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. त्यांनी हा सेट 58-56 असा घेतला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ केला आणि हा सेट 58-58 असा सुटला. अखेरच्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंकडून चुका झाल्या आणि त्या कोरियाच्या पथ्यावर पडल्या. 2014मध्ये भारतीय महिलांना कम्पाऊंड गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.