शहादा। शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तिरमल समाज सेवा संस्थेतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात एकूण सात वधू-वर जोडप्याचे शुभमंगल झाले. याप्रसंगी सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील नगरसेवक व प्राचार्य मकरंद पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, सुनील पाटील, नगरसेविका रीमा पवार, योगिता वाल्हे, नगरसेवक प्रशांत निकुम, भारती पवारसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. विवाह सोहळ्याला तिरमल समाजाचे शेकडो समाज बांधव व महिला नातेवाईकसह नाशिक, जळगांव भागातील समाजाचे करकर्ते सहभागी झाले होते विशेष म्हणजे तिरमल समाजाचा जिल्यात पहिला सामूहिक विवाह सोहळा झाला.
कृउबा समितीत मान्यवरांची उपस्थिती
आदल्या दिवशी असंख्य नातेवाईक शहरात दाखल झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून समाजाच्या करकर्त्यांनी विवाह सोहळ्याची तयारी केली होती. विवाह सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाला महिलांची संख्या अधिक होती. तिरमल समाज सेवाभावी संस्थेतर्फ वधूवरांना संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते विनायक पवार, बापू पवार, मधुकर दुरंगी यांच्यातर्फे भोजन देण्यात आले नवविवाहित वधू वराना सातपुडा साखरकरखाना चेरमन दीपक पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी समाजाचे अध्यक्ष रवींद्र तिरमले, सचिव गणेश पेंढारकर, विनायक पवार, राजेश दुरंगी, मुरलीधर तिरमले, साहेबराव तिरमले, प्रा .छगन तिरमले ,बापू पवार सह कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले