तिळगुळ घ्या, गोड बोला…

0

पिंपरी-चिंचवड : नव्या वर्षांतील पहिला सण असलेली मकरसंक्रांत शहर व पसिरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून सर्वांच्याच मोबाईलवर शुभेच्छांचा पाऊस पडत होता. यासाठी आकर्षक असे खास संदेश तयार केले होते. घरोघरी पुरणपोळीचे जेवण होते. दुपारनंतर सर्व ठिकाणच्या मंदिरांमध्ये हळदी-कुंकू व वाण देण्यासाठी महिलांची विशेष गर्दी दिसली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने संक्रांतीचा उत्साह अधिक होता.

आकाशात पतंग विहरले
पौष महिन्यात सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. आज दिवस व रात्र समान असते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. संक्रांतीला महिला वर्ग वाणाची देवाण-घेवाण करतात. यासाठी बाजारातही तिळगुळाबरोबरच वाणाचे साहित्याचीही चांगलीच रेलचेल होती. याच निमित्ताने एक प्रथा म्हणून पतंग उडविण्याचाही आनंद बच्चे मंडळींनी लुटला.