तिवरे: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या तिवरे येथील धरण फुटल्याने २३ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी शुक्रवारपर्यंत १९ जणांचे मृतदेह हाती लागले होते, दरम्यान आज एका दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता ही संख्या २० वर पोहोचली आहे. दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह हाती आल्याने मन सुन्न करणारी ही घटना आहे. एनडीआरएफ पथकातील जवान बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत. मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले. यात भेंडवाडी पाण्याखाली गेली. वाडीतील २३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अजूनही तीन जण बेपत्ता आहेत.