जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने खळबळ ; माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाला धक्का
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपाच्या नगरसेविका शबानाबी अ.आरीफ यांना तीन अपत्य प्रकरणी जिल्हाधिकार्यांना अपात्र ठरवल्याने माजी मंत्री खडसे गटाला येथे मोठा धक्का बसला आहे. 30 रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
अन्य नगरसेवकांनी घेतला धसका
शगुप्ताबी अफसर खान यांनी नगरसेविका शबानाबी अ.आरीफ यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे 2018 मध्ये याचिका दाखल केली होती तर जिल्हाधिकार्यांकडे या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याने शबानाबी अ.आरीफ यांना जिल्हाधिकार्यांनी 30 रोजी अपात्र ठरवले आहे. या आदेशामुळे भाजपाच्या खडसे गटातील नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.