सावदा : चिनावल, ता.रावेर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक चारच्या ग्रामपंचायत सदस्य तब्बसुमबी शे.अजमल यांना तिसरे अपत्य प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ज.1) नुसार विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. ग्रामपंचायत सदस्य तब्बसुमबी शे.अजमल यांना 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झाल्याचे झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या स्वाक्षरीचा आदेश अर्जदार परेश मुकुंदा महाजन व ग्रामपंचायत प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली.