तिसर्‍या अपत्याचा फटका साकळीचे ग्रा.पं.सदस्य अपात्र

0

यावल । तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीचे सदस्य जहांगीरखान कुरेशी यांना तीन अपत्य प्रकरण अखेर अपात्र व्हावे लागल्याने ग्रामपंचायतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी या संदर्भातील आदेश पारीत केले आहेत. जन्मदाखल्याच्या प्रकरणात खाडाखोड करणारे तत्कालीन ग्रामसेवक डी.व्ही.दोडके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सुचना आदेशात करण्यात आली. येत्या महिन्यात ग्रांमपचायत निवडणुका असल्याने कुरेशी यांच्या पदाचा कार्यकाळ थोडाच शिल्लक होता. या निकालाने साकळीच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली.

ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सै.तैय्यब सै.ताहेर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. ग्रामपंचायत सदस्य जहांगीरखा अशरफखां कुरेशी हे प्रभाग क्र.तीनमधून भा.ज.पा.प्रणीत पॅनलकडून निवडून आले होते तर त्यांना तीन अपत्य असल्याने अपात्र करण्याची मागणी सै.तैय्यब सै.ताहेर यांनी 1 जानेवारी 2013 रोजी जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. 13 नोव्हेंबर 2013 ला निवासी उपजिल्हाधिकारी के.सी.निकम यांनी कुरेशी यांना अपात्रही केले मात्र कुरेशी यांनी आपल्या निकालास आव्हान देण्यासाठी नाशिक आयुक्त कार्यालयासह औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.