तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात लंकेचा धुव्वा

0

मालिका भारताच्या नावावर; शिखरचे शतक
विशाखापट्टणम : शिखर धवनच्या धमाकेदार शतक व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर रविवारी भारताने तिसर्‍या एकदिवशी सामन्यात श्रीलंकेचा श्रीलंकेचा धुव्वा उडविला. श्रीलंकेने दिलेल्या 216 धावांचे लक्ष भारतीय संघाने 216 धावांचे लक्ष 32.1 षटकांमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गेल्या एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकविणार रोहित शर्मा या सामन्यात अपयशी ठरला. शिखरने मात्र, धमाकेदार फलंदाजी करीत आपले शतक पूर्ण केले. या सामन्याच्या विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या खिशात घातली. भारतीय संघाने जिंकलेली ही वन डे सामन्यांची आठवी मालिका ठरली.

फिरकीचा तडाखा
या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा 3 बाद 160 धावांवरून 215 धावांत खुर्दा उडाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण धवन आणि श्रेयसने 135 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयसने 63 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली. मोहाली वन डेतील खेळीप्रमाणेच विशाखापट्टणममध्येही रोहित शर्माची खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो केवळ सात धावांवर बाद झाला, ज्यामध्ये एका षटाकाराचाही समावेश होता.मोठी खेळी, सोबतच तीन मोठे विक्रम नावावर करण्याची रोहित शर्माकडे संधी होती. मात्र तो बाद होताच चाहत्यांची सपशेल निराशा झाली.