तिसर्‍या दिवशीही चौकशी सुरूच

0

जळगाव। जळगाव तालुक्यातील भादली गावात भोळे कुटूंबियांची क्रूर हत्या करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी 35 ते 40 ग्रामस्थांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली. मात्र, गुन्ह्याचे ठोरस कारण म्हणून पहिल्या पतीच्या दोघा भावांना ताब्यात घेत विचारणा सुरू आहे. प्राप्त तांत्रिक मुद्दे, समोर आलेल्या शक्यता पहता परत-परत तपासले जात आहे. जमीन खरेदी विक्री व्यवहार संदर्भात अधिकच्या माहितीसाठी महसूल विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे. तसेच तलाठी-तहसीलदार कार्यालयातील नोंदीचाही आधार घेतला जात आहे. त्यामुळे आज बुधवारी तलाठी-तहसिलदार यांना नोंदी तपाण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी बोलवले होते.

जमीन खरेदी-विक्रींच्या नोदींची घेतली माहिती
भादलीच्या भोळेवाडा गल्लीत 20 मार्चच्या सकाळी प्रदीप सुरेश भोळे, संगीता प्रदीप भोळे, दिव्या, चेतन अशा चौघांची निघृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खुनाची पद्धत व प्रदीप भोळे यांच्या शेतीचा झालेला व्यवहार आणि त्यातून लाखो रुपये मिळाल्याची गावभर चर्चा यावरून दरोड्याची शक्यता वर्तवली जात होती. नंतर खरेदी-विक्री व्यवहारात काही बिनसले का याची चौकशी झाली त्यात सौदेपावती झालेला महेश मोतीराम पाटील यांची पहिल्याच दिवशी कसून चौकशी करण्यात आली. त्यात फारसे काही आढळले नाही. म्हणून संगीताच्या पहिल्या लग्नाचे सासर, मयत पती नितीन पाटील याचा मोठा भाऊ, लहान भाऊ यांची वेगवेगळ्या मुद्द्यावर सलग चौकशी सुरू आहे. जमीन व्यवहारातून खून झाल्याचा कयास असल्याने पोलिसांनी महसूल विभागाशी संपर्क करीत माहिती घेण्यास सुरवात केली. गाव तलाठींना बोलावून घेत नेमक्या काही नोंदीबाबत आज विचारणा करण्यात आली.

पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू
भादलीत झालेल्या या घडलेल्या घटनेची महाराष्ट्रभर चर्चा असताना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यापासून तपासाधिकार्‍यांपर्यंत सर्वच्या सर्व तपासातच व्यस्त आहे. गुन्ह्यात तपासात सूत शोधण्यासाठी पोलिसदल जुंपले आहे. कुणीतरी कोठूनही संशयितांचा मार्ग सांगावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेशाखा, गोपनीय विभाग, नशिराबाद डीबी पथके गावातून माहिती व इतर बाबी गोळाकरण्यात व्यस्त आहे. याबरोबरच पोलिस महानिरीक्षकांनी बुधवारी सकाळी पुन्हा या गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. दुपारी अधिकार्‍यांकडून पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आलेले इसमांची कसून चौकशी सुरू होती.

गुप्त माहिती देणार्‍यास बक्षीस…
भादली येथील भोळे कुटुंबाच्या खून प्रकरणी गुप्त माहिती देणार्‍यास पोलिस दलातर्फे 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच पत्रकही पोलिसांनी छपाले असून ते भादली आणि परिसरात वाटण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेच पटण्यासारखे नाही….
प्रदीप भोळेच्या घरात घटनेच्या रात्री चौघांची निघृणपणे हत्या झाल्याने गाव सुन्न आहे. घराची परिस्थिती पाहता एका बाजूने तुरकाठ्यांचे कूड, दुसर्‍या बाजूने केवळ अडोसा आणि विशेष म्हणजे पाच ते सहा फूट अरुंद गल्ली अशी परिस्थिती असताना गुन्हा घडल्याची वेळ रात्र बारा ते पहाटे चार वाजेच्या आतील आहे. कारण चार वाजता नळांना पाणी आले होते. घटनास्थळ प्रदीपच्या घरात मारेकरी व मयत यांच्यात बर्‍यापैकी झटापट आरडा ओरड झाली आहे. मारेकर्‍याचा एक वार चुकून त्याने डाळीचे पोते फाडले, घराचे एकदार उघडेच होते. अशाही परिस्थिती शेजारी समोरील रहिवासी कुणीही काहीच पाहिले व ऐकले नसल्याचे सांगितले जात आहे, हेच पटण्यासारखे नसल्याचे पोलिसांचे
म्हणणे आहे.