तिसर्‍या दिवशी प्राथमिक शिक्षकांचे उपोषण मागे

0

नंदुरबार। ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवांनी सकारात्मक भूमिका घेवून चर्चेसाठी सोमवारी मंत्रालयात बोलविल्याने काल तिसर्‍या दिवशी प्राथमिक शिक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले . नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा अवघड क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकांची बदली पुन्हा त्या ठिकाणी करू नये, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

काल उपोषणाचा तिसरा दिवस होता. दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यासाठी ग्रामविकास विभागाचे प्रधानसचिव असिमकुमार गुप्ता यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी सोमवारी मंत्रालयात बोलविले आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.