जिनेव्हा । भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णाने जिनेव्हा फिडे ग्रापी बुद्धिबळ स्पर्धेतील चांगल्या कामगिरीचे सातत्य कायम राखले आहे. हरिकृष्णाने तिसर्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या आणि स्पर्धेतील दुसर्या मानांकित अझैरबैजानच्या शाख्रियार मेमेदरोव्हला बरोबरीत रोखले.
जागतिक क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर असलेल्या हरिकृष्णाने पाढर्या मोहर्यांनी डावाची सुरुवात केली. आक्रमक चाली रचणार्या हरिकृष्णाला मधल्या खेळामध्ये विजयाची संधीही मिळाली होती. पण चुकीच्या चाली रचल्यामुळे हरिकृष्णला सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. या सामन्यानंतर हरिकृष्ण म्हणाला की, माझा खेळ चांगला झाला होता. पण महत्वाच्या वेळी चुकीच्या चाली केल्यामुळे विजय दुरावला.
स्पर्धेतील दुसर्या बरोबरीनंतर तिसर्या फेरीअखेर हरिकृष्णाचे दोन गुण झाले आहेत. पहिला सामन्यात हरिकृष्णाने विजय मिळवला होता. त्यानंतर पुढच्या दोन्ही सामने त्याला बरोबरीत सोडावे लागले. चौथ्या फेरीत हरिकृष्णचा सामना अग्र पटावर खेळणार्या अझैरबैजानच्या गॅ्रण्डमास्टर तैमुर राद्जाबोव्हशी होणार आहे. या लढतीबद्दल हरिकृष्णा म्हणाला की, तो चांगला खेळाडू आहे. त्यामुळे मी सामन्यप्रमाणे खेळ करणार आहे.