तिसर्‍या संशयितालाही अटक

0

जळगाव । सचखंड एक्स्प्रेसमध्ये बोगीच्या दारात बसलेल्या तरुणाला मोबाईलसह ओढणार्‍या गँग मधील दोन चोरट्यांना सोमवारी अटक करण्यात आली. यातच रेल्वे पोलिसांना जबरीलूट व मृत्युस कारणीभुत असल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर संशयीताच्या अटकेची चिंता सतावत असतांना गेंदालालमील, शिवाजीनगर नेटवर्कींग असलेल्या शहर पोलिसांनी तीसराही संशयीत पहाटे दोन वाजता अटक करुन रेल्वे पोलिसांना सोपवला आहे. दरम्यान, संशयितांना अटक झालेली आहे मात्र या घटनांना आळा कसा बसावा यासाठी रेल्वे पोलिसांनी अशा ठिकाणांवर गस्त घालून चोरट्यांना पकडून त्यांना चांगला धडा शिवविण्याची गरज आता भासत आहे.

दोघा पोलीस कर्मचार्‍यांनी तिसर्‍याला घेतले ताब्यात
ग्वालिअर येथे शासकीय महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या नरेश चंद्रप्रकाश जैस्वाल (वय 19, रा. औरंगाबाद) अपुर्व जानबा हे दोघं विद्यार्थी सचखंड एक्सप्रेसने औरंगाबाद ते ग्वालीअर प्रवास करीत होते. जळगाव स्थानकावरुन गाडी सुटताच नरेशला फोन आला. नेटवर्क नसल्याने रेल्वे बोगीच्या दारात बसून बोलत असतांना मोबाईल चोरट्यांनी त्याला कानाला लागलेल्या मोबाईलसह ओढल्याने खाली कोसळून त्याचा दुर्देवी मृत्यु झाला होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जळगाव आउट पोस्टला दाखल गुन्ह्यात सोमवार (ता.6) रोजी रेल्वेपोलीस, रेल्वे गुन्हे शाखा डीबी पथकाचे प्रयत्न थकल्यावर शहर पोलिसांनी मदतीचा हात पुढे करीत संशयीत अटक करण्यास संपुर्ण मदत केली. पहिल्याच दिवशी गुन्ह्यातील मुख्य संशयीत भिकन ऊर्फ सादीक सय्यद युसूफ आणि नाझीमखाँ कदीरखाँ पटवे ऊर्फ नाझीम तरकारी या दोघांना अटक करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत पोलिस निरीक्षक डी.बी.सरक संशयीतांची विचारपुस करीत होते. गुन्ह्यातील तीसरा संशयीत असल्याची माहिती मिळताच संशयीताच्या मगावर असल्याने पथकातील महेंद्र पाटील, अनील नगराळे, दुय्यम अधीकार्‍यांच्या दोन पथकाला शहर पोलिस ठाण्यातील आनंदसींग पाटील, इम्रानअली सैय्यद या दोघा कर्मचार्‍यांनी तीसरा संशयीत मुन्ना ऊर्फ इस्माईलखान गफ्फार खान याचा शोध घेत पथकाच्या ताब्यात दिले.

पाण्याच्या टाकीवरुन अटक
तपासपथक शहर पोलिसांच्या टिमला घेवुन पहाटे दोन वाजता गेंदालालमील भागात संशयीताचा शोध घेत होते. मित्र आफताब याच्या घरी चौकशी केली, मात्र तो ही नव्हता. मात्र घरी पोलिस पोचल्याचे व आपला शोध घेत असल्याचे पोलिसांवर नजर ठेवुन असलेल्या दोघांना दिसत होतो खाली उतरत असतांना टाकीजवळ हालचाल दिसल्याने, चाणाक्ष पोलिसाने टाकीकडे धाव घेतली, तिथ दोघांमध्ये मुन्ना इस्माईलखान दडून बसल्याचे आढळून आला. लगेच त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या मुन्ना ईस्माईलखान याला पहाटे तीन अंधारातून तावाडीत घेतल्यावर बाहेर आणण्यात आले. मोबाईल हिसकावल्यानंतर तो पोरगा (पडल्याने) आराडा ओरड झाली. नाझीम व भिकन दोघे पळत सुटले. असे सांगितले.