मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. देशात २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात एकूण १४ राज्यात मतदान होणार आहे. एकूण ११५ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी राज्यात १४ मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, औरंगाबाद, जालना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यातच रविवार आल्यामुळे प्रचाराचा धडाका उडणार आहे. देशात तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमन दीव या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत.