तिसऱ्या दिवशीही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे संप सुरु

0

मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.

राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. सगळीकडे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यास अद्याप यश आलेलं नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिले जाते. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना १५ ते ३० हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिले जाते. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी ६ हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.