तिहेरी अपघातात एक ठार; 7 जण गंभीर जखमी

0

शिंदखेडा रोडवरील घटना

शहादा । आयशरला ओव्हरटेक करण्याच्या नादात 407 ला समोरून येणार्‍या ट्रकची जोरदार धडक, 407 उलटी होवून आयशरला आदळल्याने 407 वरील चालक जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहादा-दोंडाईचा  सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमीना तातडीन धुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आयशरवरील चालकाच्या फिर्यादीवरून 407 चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर चालक अनिल शंकर राठोड (वय-25) रामेश्‍वर तांडा पा.लोहारा ता.पाचोरा यांच्यासह गावातील सुपडू शेनफडून बाविस्कर (वय-52), गौतम सुपडू बाविस्कर (वय-36) दोन्ही रा.रोटवद ता.जामनेर, गोकुळ ताराचंद राठोड (वय-26) रा. जंगला ता.सोयगाव हे सर्वजण तळोद येथील यात्रतून बैल खरेदी करून अनिल राठोड यांच्या आयशर गाडीमध्ये बैल खरेदी करून 20 एप्रिल रोजी परतत असतांना शहादा पुढील दोंडाईचा रोडवरील श्रीराम कॉटन समोर सकळी 6.30 वाजेच्या सुमारास आयशर (एमएच 18 एए 8312) मागून येणार्‍या 407 क्र. (जीजे 05 बीयू 8173) ने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या भरधाव ट्रक क्र (एपी 16 टीएच 9919) ने 407 ला जोरदार धडक दिल्याने 407 गाडी आयशरच्या बाजूला उलटी होवून गाडीला धडकली. त्यामुळे सुपडू शेनफडून बाविस्कर (वय-52), गौतम सुपडू बाविस्कर (वय-36) दोन्ही रा.रोटवद ता.जामनेर, गोकुळ ताराचंद राठोड (वय-26) रा. जंगला ता.सोयगाव हे गंभीर जखमी झाले. तर 407 वरील चालक इंद्रजित रामकलक सरोज (वय-35) रा. सुरत हा जागीच ठार झाला तर क्लिनर वपन बहादुर सिंग कोसवा (वय-27) रा. सुरत हा गंभीर जखमी झाला. आणि ट्रकवरील चालक माहनराव सत्यनारायण कोंडावटी (वय-29)रा.बालाजी नगर, जि.कृष्णा आंध्रप्रदेश व क्लिनर ईश्‍वरीय वैय्यरिय पोथराज(वय-50) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. आयशरवरील चालक अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून 407 चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.