तिहेरी तलाकवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

0

अलाहाबाद । राज्यघटनेपेक्षा कोणताही पर्सनल लॉ मोठा नाही. तिहेरी तलाक म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघनच आहे. राज्यघटनेच्या कक्षेत राहूनच पर्सनल लॉ लागू केला जाऊ शकतो.

न्यायव्यवस्थेच्या पलिकडे जाऊन अथवा अधिकारांविरोधात कोणताही फतवा मान्य असणार नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. मुस्लिम पतीद्वारे तिहेरी तलाक दिल्यानंतर पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तिहेरी तलाक आणि फतव्यासंदर्भात हे मत व्यक्त केले आहे. महिलांना सन्मान दिला जात नाही, तो समाज सुसंस्कृत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.