तिहेरी तलाक विधेयकाचे कायद्यात रुपांतर

0

नवी दिल्ली: मुस्लीम महिलांसाठी ऐतिहासिक असा तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील सही केली आहे. त्यामुळे आता याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. तसेच १९ सप्टेंबर २०१८ पासून हा कायदा देशभरात लागू झाला आहे.

लोकसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले मात्र, येथे एनडीएला बहुमत नसल्याने ते पारित होऊ शकेल की नाही याबाबत शंका होती. मात्र, ९९ विरुद्ध ८४ मतांनी हे विधेयक राज्यसभेत बुधवारी मंजूर झाले. त्यामुळे मोदी सरकरचे हे मोठे यश मानले जात आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सहीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे.