तीने सर्व व्यक्तिरेखा जीव ओतून साकारल्या!

0

श्रीदेवीने बॉलिबूडच्या अनेक व्यक्तिरेखा साकारून दर्शकांच्या हृदयावर आपल्या आठवणई कोरल्या आहेत. तीच्या जाण्याची चाहूल तीच्या चाहत्यांना आधिच हुरहुर लावून गेली आहे. ’खुदा गवाह’ या चित्रपटात बादशाह खानची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांना कदाचित त्यांच्या ’बेनझिर’ अर्थातच श्रीदेवीच्या मृत्यूची अशीच कुणकुण लागली होती. त्यांनी श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त येण्याच्या काही मिनिटांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले, ’न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है!.’ अमिताभ बच्चन खूप बैचेन झाले होते, याचे कारण त्यांना कळत नव्हते. कदाचित त्यांना श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त तिच्या कुटुंबातून मिळाले असावे. ’आखिरी रास्ता’ आणि ’खुदा गवाह’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी एकत्र काम केले होते.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या सेटवरही श्रीदेवीने हजेरी लावली होती. तीच्या व्यक्तीरेखा जीव ओतून तीने साकारल्या होत्या. नात्यांना केंद्री ठेवून लेखक साहित्यीक रचना करतात. नाटक आणि चित्रपटातही अशा रचनांचा वापर अनेक लेखक-दिग्दर्शकांनी केलेला आडळतो. साहित्य हे अक्षरधन असल्यामुळे लेखकाला आपल्या संवेदना पाहिज्या तितक्या विस्ताराने मांडता येतात. चित्रपट वा नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे कथा कादंबरीची पटकथा तयार करावी लागते. नाटक ज्या रंगभूमिवर सादर होते तिलाही जागेच्या क्षेत्रफळाची मर्यादा असल्यामुळे सर्व भिस्त अभिनेते आणि दमदार संवाद या वरच अवलंबून असते. चित्रपटाचा कॅनव्हास मात्र प्रचंड मोठा पण या माध्यामात सर्वकाही दृष्याद्वारे सांगावे लागते. मनाची घालमेल, घुसमट, ओढ, प्रेम, राग वगैरे शब्दांद्वारे रंगवून सांगता येतो मात्र हे सर्व पडद्यावर दाखविताना धांदल उडते. कसबी दिग्दर्शकाला यासाठी अनेकदा प्रतिमांचा वापर करावा लागतो. अनेकदा या प्रतिमा जीवंत हाडामासाच्या रूपातही आपल्याला भेटू शकतात. त्या श्रीदेवीच्या रूपानेच भेटल्या असे म्हणाना.

पडद्यावरील तिची देहबोली तर थेट भिडणारी. डोळ्यातुनच संवाद अंगावर येऊन आदाळणारे. पडद्यावरचा तिचा वावर अगदी सहज. विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार आणि वास्तवतेचे भान जपणार्‍या श्रीदेवीला विसरणे शक्य नाही. काही दिवसांपूर्वीच तिच्या हस्ते एका फिटनेस संदर्भातील पुस्तक प्रकाशन झाल्याच्या सोहळ्यात तिने टिकवलेला फॉर्म अर्थात आपले वजन व फिटनेस पाहून विशेषच कौतुक वाटले. तीचे चित्रपटाच्या सेटवरचे वैशिष्ट्य म्हणजे ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन याचे भान हे फार पूर्वी चित्रपटांच्या शूटिंग कॅमेरासमोर उभे राहताच तिच्यात सकारात्मक बदल दिसे. दिग्दर्शकाच्या सूचना आणि अपेक्षा ती आत्मसात करायची. दृश्याचे कितीही रिटेक झाले तरी ती कधीच कंटाळून जात नसे. तीचा अमोल पालेकरसोबतचा ‘सोलवा सावन ‘ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. पण ती नावारूपास आली ती जीतेंद्रासोबतच्या ‘हिम्मतवाला ‘ या मसालेदार मनोरंजक चित्रपटापासून. त्यातील तिची धडाकेबाज नृत्ये लोकप्रिय झाली व ती हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करु शकली. चेन्नईवरुन ती तेव्हा मुंबईत आल्यावर तिचा मुक्काम प्रामुख्याने वांद्रा बॅण्ड स्टॅण्डच्या सी रॉक हॉटेलमध्ये असे. कमल हसनसोबतच्या ‘सदमा मधील तिच्या अभिनयाचे कायमच कौतुक होत राहिले. पण ‘चालबाज ‘, ‘खुदा गवाह ‘, ‘लम्हे ‘ व ‘गुरुदेव ‘ या चारही चित्रपटात तिच्या दुहेरी भूमिकेतील विविधता कमालीची कौतुकास्पद आहे. त्यातून तिची अष्टपैलु अभिनेत्री अशी रेंज दिसते.

– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111