तीन गावांना मिळाली ‘कृषी संजीवनी’

0

जलयुक्त शिवारातंर्गत दोन गावांचा आराखडा तयार होणार

भुसावळ- राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे.त्यानुसार चौथ्या टप्प्यात तालुक्यातील दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे.तर तिन गावांचा पोपरा नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश केला आहे.

चौथ्या टप्प्यात दोन गावांचा समावेश
राज्य शासनाच्या माध्यमातुन राज्य भरात सन -2015 पासुन जलयुक्त शिवार अभियान टप्प्या टप्प्याने राबवले जात आहे. अभियानाचा हा चौथा टप्पा असून आतापर्यंत तालुक्यातील 46 गावांमध्ये जलयुक्त अभियान राबवण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 17, दुसर्‍या टप्प्यात 15 आणि चौथ्या टप्प्यात 14 गावांचा समावेश करून या गावांमध्ये सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, तलावातील गाळ काढून खोलीकरण, नाले, बंधारे अशी विविध कामे योजनेतंर्गत करण्यात आली आहे तर चौथ्या टप्प्यात तालुक्यातील बेलव्हाय आणि भानखेडे या दोन गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करण्यात आल. या दोन्ही गावामधील सरपंच, प्रगतीशील महिला ,प्रगतीशील शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कृषी संजीवनी प्रकल्प
राज्य शासनाच्या कृषी विभागातंर्गत पोपरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत तालुक्यातील तीन गावांची निवड झाली आहे. यामध्ये निभोंरा बुद्रुक आणि बेलखेडे या तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पातंर्गत या गावांमध्ये पाणलोट विकास, पीक प्रात्यक्षिक, शेती शाळा, पीक प्रात्यक्षिक यासह कृषी विकासाची सर्वांगीण कामे केली जाणार आहेत.