तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडणुका

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंप्राळा, महालखेडा व कोर्‍हाडा येथील ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडीनंतर या गावांमध्ये पदाधिकारी व समर्थकांनी जल्लोष केला. पिंप्राळा ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून एक जागा रिक्त आहे. येथील सरपंच लताबाई झाल्टे यांच्यावर अविश्‍वास मंजूर झाला. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी या राखीव पदावरील सरपंच निवडीसाठी 1 डिसेंबरला विशेष सभा झाली.

महालखेडा व कोर्‍हाडे येथे मतदान
त्यात विनोद झाल्टे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली तर महालखेडा येथे सरपंचांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होेते. एकूण सात सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये दोन जागा रिक्त आहे. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. यात ज्योत्स्ना संजय पाटील यांना मतदान पध्दतीने गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कोर्‍हाडे येथील सरपंच यांनी राजीनामा दिला होता. येथे 15 रोजी झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर प्रविण कांडेलकर व रेखा इंगळे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र एकूण सातपैकी एक जागा रिक्त आहे. उर्वरित सहापैकी कांडेलकर आणि इंगळे यांना प्रत्येकी तीन मते मिळाली. यामुळे ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात कौल प्रविण कांडेलकर यांना मिळाला, अशी माहिती तहसिल कार्यालयातून निवडणूक लिपीक एस.आर. सहारे यांनी दिली.