तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई

0

जळगाव : सतत गैरहजर, कामात दुर्लक्ष, कामकाजातील दिरंगाई आदी कारणांसाठी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील एक ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. तर सात जणांना नोटीस पाठविण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील ग्रामसेवक जी.के.चव्हाण, टाकळी येथील ग्रामसेवक सुरेश मुरलीधर पाटील ह्या दोन ग्रामसेवकांवर तर बोदवड तालक्यातील आमदगाव येथील ग्रामसेवक गणेश अल्हाट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नोटीस पाठविलेले ग्रामसेवक
कामकाजात होत असलेल्या दिरंगाईमुळे वारंवार तक्रारी येत असल्याने मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील सात ग्रामसेवकांना नोटीस पाठविण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील ज्योती कोचरे (सारोळा), फत्तेसिंग मथुरे(घोडसगाव), प्रताप बोदडे(मुक्ताईनगर), बी.जी.पटवारी(चिंचखेडा), एस.बी.अहिरे(पारंबी) तर बोदवड तालुक्यातील सी.आर.राजोरे, व्ही.डी.बाविसाने (जलचक्र) या ग्रामसेवकांना नोटीस पाठविण्यात आले आहे.