तीन जणांवर दंडात्मक कारवाई

0

पिंपरी-चिंचवड । शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असूनही उघड्यावर शौचालयाला जाणार्‍या मोशी प्राधिकरण परिसरातील तीन जणांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई करुन दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर स्वच्छ राखण्यासाठी शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सुविधा असूनही उघड्यावर जाणार्‍या नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. गुडमॉर्निंग पथकाकडून त्याबाबत कारवाई करण्यात येत आहे. ’क’ क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आर. एम. बेद, आरोग्य निरीक्षक व्ही. के. दवाळे यांनी ही कारवाई केली.