कश्मीरात तीन जवान शहीद

0

श्रीनगर : दहशतवाद्यांनी गुरूवारी काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सकाळी लष्करी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यात मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. कुलगाम येथेही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

शोपियानमध्ये लष्कराच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार करून तिघेही दहशतवादी फरार झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा देऊन सर्वत्र शोधमोहीम सुरू केली होती. तर कुलगाम येथील गोपालपोरा भागातही गुरूवारी पहाटे लष्कराने चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या भागात संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या जवानांसह जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुगान गावाला वेढा दिला.