चाळीसगाव: तीन तरूण सातत्याने त्रास देत असल्याने तालुक्यातील खेरडे येतील युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या पंधरा दिवसांपासून घरासमोर येऊन हावभाव करून एका मुलीला त्रास दिला जात होता. मुलीने त्रासाला कंटाळून मोनोसिल औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खेरडे येथे घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेरडे (सोनगाव) येथे एका मुलीला विशाल एकनाथ जाधव, विलास पुरणदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण सर्व रा. खेरडे (सोनगाव) ता. चाळीसगाव हे तीन तरूण गेल्या पंधरा दिवसांपासून शारीरिक व मानसिक छळवणूक करत होते. मात्र दि. १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास या तिघांनी मुलीच्या घरासमोर उभे राहून हातवारे करत इशारा केला. यामुळे मुलीने या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केली. याबाबत गोरख चना राठोड (वय-४९) रा. खेरडे (सोनगाव) ता. चाळीसगाव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०५ नुसार आज दुपारी वरील आरोपी तीघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत. हि घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या तीन्ही तरूणाचा शोध सुरू केला आहे.
Prev Post
Next Post