जोधपूर । हिंदू मुस्लीम समुदयातील युवक युवतींचे प्रेमविवाह नवनि राहिलेले नाहीत. पण आपल्याच धर्मातील कुप्रथेविरोधात जाऊन एका मुस्लीम युवतीने हिंदू धर्मिय मुलाशी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. जोधपुरपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या फलोदी गावातील तस्लीमाने मुस्लीम धर्मातील तीन तलाक पद्धतीच्या विरोधात जाऊन हिंदू पद्धतीनुसार एका मंदीरात आशीष पुरोहित नावाच्या युवकाशी विवाह केला आहे.लग्नानंतर तस्लिमा म्हणाली की, लहानपणापासून हिंदू धर्म आवडत होता. या धर्मात महिलांसाठी आदरभाव असतो. हिंदू धर्मात लग्नानंतर मुले पत्नीनंतर इतर महिलांकडे बहिण, मुलीच्या नात्याने बघतात. मुस्लिम समाजात मात्र मुलीच्या इच्छेविरुद्ध तीचे लग्न लावण्यात येते.
मुस्लीम धर्मात असलेल्या तीन तलाक प्रथेला देशात वेगवेगळ्या पद्धतीने विरोध होत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना तीन तलाक पद्धत, मुस्लीम पुरुषांची चार लग्ने आणि निकाह हलाला पद्धतील विरोध केला आहे. घटनेनुसार त्यांना मान्यता देता येत नाही आणि तीन तलाक हा महिलांसाठी लैंगिक भेदभाव असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र मुस्लीम पसर्नल लॉ बोर्ड आणि मुस्लीम धर्मगुरुंनी सरकारची भूमिका आणि न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला विरोध केला आहे. मुस्लिम धर्मगुरुंनी हा मुद्दा धर्माशी निगडीत असल्याचे सांगितले आहे. एकीकडे कट्टर मुस्लीमांचा विरोध होत असताना मुस्लीम महिलांनी मात्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करत न्यायालयात दाद मागितली आहे.