सांगली । सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाने चांगली मुसुंडी मारली आहे. तब्बल 29 जागा भाजपने जिंकल्या आहेत. मात्र काही तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपला रोखण्यात यश आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढणार्या भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादीला आघाडीचा फायदा
याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने 4 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. कवठेमहांकाळ, शिराळा आणि खानापूरमध्ये भाजप भुईसपाट झाली आहे. तर कवठेमहांकाळ हा भाजप खासदार संजय काका पाटील यांचा मोठा प्रभाव असणारा तालुका असून या ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी स्थानिक आघाडी स्थापन केली होती. मात्र या ठिकाणी सर्वच्या सर्व 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितराव घोरपडे आघाडीने विजय नोंदवला आहे. तर खानापूरमध्ये शिवसेनेने 3 पैकी 3 जागांवर विजय मिळवत भाजपला धोबीपछाड दिली आहे. यामुळे जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळवले असले तरी तीन तालुक्यांमध्ये भाजपला व्हाईटवॉश मिळाला आहे. यावेळी या ठिकाणी शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी आणि कॉग्रस यांनी आघाडी केल्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा झाला आहे. युतीमुळे त्यांच्यास सर्वच्या सर्व जागा आल्या आहेत.