तीन दहशतवाद्यांना जीवंत पकडले

0

जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या तीन दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय जवानांनी जीवंत पकडले आहे. हे तिन्ही दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आले असून, त्यांच्या अटकनेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता.

मोठा शस्त्रसाठा जप्त!
बारामुल्ला येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिस आणि भारतीय जवानांना मिळाली होती. यानंतर दोन्ही सुरक्षा दलांनी संयुक्तपणे मोहीम राबत या दहशतवाद्यांचा शोध घेतला व त्यानंतर काल रात्री उशिरा या सर्व दहशतवाद्यांना जीवंत पकडण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले. यानंतर या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये 250 ते 300 काडतुसे, ग्रेनेड, बॉम्ब तसेच काही बंदुका असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. यानंतर या सर्व दहशतवाद्यांना पुढील चौकशीसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. भारतीय सुरक्षा दलांचे हे यश मोठे यश मानले जात आहे. या तीन दहशतवाद्यांना जीवंत पकडल्यामुळे बरीच महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामुळे खोर्‍यामध्ये घडणारा संभाव्य धोकादेखील यामुळे नष्ट झाला आहे.