तीन दिवसीय जिल्हा पोलीस स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

0

शिरपूर। धुळे जिल्हा पोलीस विभागातर्फे विविध क्रीडा स्पर्धेचे शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या मुख्य इमारतीच्या व आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने योगदान मिळाल्याबद्दल आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉल येथे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार यांच्या हस्ते तसेच शिरपूरचे पोलीस अधिकारी ललित तडवी, पोलिस निरीक्षक संजय सानप, जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गुन्हेविषयक घटनांचा घेण्यात आला आढावा
एस.एम.पटेल सभागृहात जिल्हा पोलीस दलाची गुन्हे विषयक बैठक घेण्यात आली. यात विविध गुन्हयांचा आढावा घेण्यात आला. पुरुष व महिलांचे व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, फुटबॉल तसेच विविध खेळांमध्ये सर्व पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यानंतर काही सामने एस.पी.डी.एम. महाविद्यालयात घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ललित तडवी, राखीव पोलीस निरीक्षक बनसोडे, क्रीडा समन्वयक मोहसीन काझी, सिदाप्पा गवळी, प्रशिक्षक नारायण माळी, राजेसाहेब पटेल, सुनिल विंचुरकर यांनी तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य सिद्धार्थ पवार, प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, प्रा.विनय पवार, आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे सर्व प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचे सहकार्य लाभले आहे.