अमळनेर। शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. नाशिक, जळगांव व धुळे येथील पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत हा गुटखा जप्त करण्यात आला आहे लाखो रुपये किमतीचा गुटखा सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून गुटखा बंद झाल्यापासून अमळनेर शहरात ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे
सव्वा चार लाखांचा गुटखा
शहरातील आययुडीपी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी झालेल्या धडक कारवाईत सव्वा चार लाखांचा गुटखा आढळला गोकुळ पाटील यांच्या गोदामासह ओम. टी., शनीपेठ, पैलाड प्रकाश वासवाणी यांच्या चोपडा रोडवरील गोदामावर हे छापे घालून कारवाई झाली आहे ओम. टी. मधून 3 लाख 33 हजार, प्रकाश वासवाणी यांच्या गोदामातून 31 हजार 335, गोकुळ पाटील यांच्या गोदामातून 50 हजार 867 असा एकूण सव्वा चार लाखांचा गुटखा जप्त केला आहे सर्व मुद्देमालाचा पंचनामा करून जप्त करून नेला आहे
कारवाईचा देखावा?
तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी गावाला आमंत्रण दिल्याचा आव आणून एकाच ठिकाणी पंचनाम्याची करीत होते त्यामुळे सदरची कारवाई फक्त नावाला व देखावा असल्याची दबक्या आवाजात व्यावसायिकांची चर्चा सुरु होती कारवाई फक्त नावाला असल्यामुळे पुन्हा शहरात जोमाने गुटखा विक्री होईल यात शंका नाही पोलिसांचा हस्तक्षेप नसल्यामुळे कारवाई पारदर्शक होईल का असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.