तीन पॅसेंजर गाड्यांचा रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

0

भुसावळ- सुमारे दोन महिन्यांपासून विविध तांत्रिक कामांमुळे बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या रविवारपासून सुरू होत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरू होणार्‍या गाड्यांमध्ये दररोज पहाटे साडेसहा वाजता सुटणारी भुसावळ-नरखेड, सकाळी 9.30 वाजता सुटणारी भुसावळ-कटनी-आरी व दुपारी अडीच वाजता सुटणारी भुसावळ-वर्धा पॅसेंजरचा समावेश आहे. विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला होता. हे काम पूर्णत्वास येत असून रविवारी सुरुवातीला तीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तर भुसावळ-देवळाली व भुसावळ-मुंबई येत्या दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.