तीन प्राध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0

चेन्नई-तिरुपती येथील एसवी मेडिकल कॉलेजच्या तीन प्राध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. चित्तूर जिल्ह्यातील राहत्या घरात गळफास घेऊन तिने जीवन संपविले आहे. दरम्यान आरोपी प्राध्यापकांवर कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

३० वर्षीय पीडितेने एप्रिल महिन्यात आंध्रप्रदेशच्या राज्यपालांना पत्र लिहून तीन प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर मे महिन्यात कॉलेज प्रशासनाने एका चौकशी समितीची स्थापना केली होती. दरम्यान, परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे विद्यार्थिनी तणावात होती. जाणूनबुजून मला नापास करण्यात आल्याचाही आरोप तिने केला होता. तर, विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी चौकशी समितीने अहवाल सोपावला नाही आणि त्या तीन प्राध्यापकांनी माध्यमांसमोर येत संबंधित तरुणीलाच मानसिक रुग्ण असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळेही ती तणावात होती, असा आरोप केला आहे.