शिंदखेडा:धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट महाभयानक आहे. त्यात धुळे जिल्हा रेडझोनमध्ये आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांसह छोटे उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. उद्योग बंद असल्याने उत्पनाचे कोणतेही साधन नसल्याने लाॕकडाऊन या काळामध्ये प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे मार्च २०२० पासून मे २०२० महिन्यापर्यंतची सर्व ‘लाईट बिल’ माफ करावे अशी मागणी माजी नगरसेवक सुरज देसले यांनी केली आहे.
धुळे जिल्हा औद्योगिक कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक उद्योग व्यवसायासाठी व शिक्षण आणि इतर कारणासाठी शिंदखेडा शहर व जिल्ह्यात वास्तव्यासाठी आहेत. शेतकरी, छोटे अर्थात लघु उद्योग- व्यवसाय या लाॕकडाऊन बंद आहेत.
दिल्लीमध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा 100 युनिटपर्यंत वीज बिल सर्वांना सरसकट माफ करण्यात यावे, अशीही मागणी केली आहे.